सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

श्री गजानन महाराज पालखीला रॉबिन हूड आर्मीकडून तब्बल ५१९ किलो धान्य सुपूर्द

सोलापूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेसाठी शेगावहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी समाजाने दिलेले तब्बल ५१९ किलो धान्य रॉबिन हुड आर्मीकडून श्री संत गजानन महाराज संस्थानला सुपूर्द करण्यात आल्याची माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली. रॉबिन हूड आर्मीच्या पालखी ड्राईव्ह उपक्रमास सोलापूरकरांनी सहभाग घेत प्रचंड प्रतिसाद दिला.

सोलापुरातील हाॅटेल, मंगल कार्यालय व कार्यक्रमातून शिल्लक राहिलेले अथवा ताजे अन्न गरजूंपर्यंत पोहोच करणाऱ्या राॅबीन हुड आर्मी सोलापूरच्या वतीने दररोज अन्नसेवा उपक्रम राबविला जातो. आतापर्यंत सात वर्षांमध्ये सात लाखांपेक्षा जास्त गरजूंना अन्न पोहोच करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध समाजपयोगी उपक्रम देखील राबविले जात आहेत. सोलापूर मध्ये मुक्काम असणाऱ्या श्री गजानन महाराज पालखीतील वारकरी व संप्रदायासाठी धान्य देण्याचे आवाहन रॉबिन हूड आर्मी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सोलापूरकरांनी पालखी ड्राईव्ह या उपक्रमामध्ये एकूण ५१९ किलो धान्य, पदार्थ व जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत.

शेगाव ते पंढरपूर गजानन महाराजांच्या पालखीत चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या भोजन व इतर गरजेसाठी धान्य, जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन रॉबिन हूड आर्मी केले होते. यानंतर सोलापूरकरांनी गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ, तेल, साबण, गूळ, लाडू, चहा, साखर, खजूर, रवा, साखर,पोहे, शेंगा, साबुदाणा, चुरमुरे आदी किराणा साहित्य दिले. तसेच पावसा पासून संरक्षण व्हावे म्हणून छत्र्यांचे वाटप देखील करण्यात आले. हे साहित्य स्वयंसेवकांनी घरी जाऊन स्वीकारत विशिष्ट पॅकेट करून संजय क्षीरसागर यांच्या उपस्थित व पालखी प्रमुख सतीश पुकट यांच्याकडे सुपूर्द केले.

या उपक्रमासाठी कनक नागदेव, अवधूत तोळबंदे, अजिता भिडे, नारायण जोशी, गडगेप्पा कोरवार, योग समर्थ ग्रुप अनुराधा खरे, गुरुदत्त जाधव, वैभव वाघमारे, कल्पना दाते, श्रीनिवास कासल, सिद्धराम विजापूरे, अश्विन क्षीरसागर, इशा क्षीरसागर, श्रुतिका जाधव, शैलेश करवा, अनिल मल्ला, जसोदा तापडिया, सूर्यकांती नायर, सुयोग मोहोळकर, राजश्री तातूस्कर, नित्यानंद शिंदे, लतिका साठे, सिया देवस्थळी, अर्चना आघाव, आशाताई वानारे, श्रीपाद कुलकर्णी, विशाल कलानी, नंदकिशोर बलदवा आदींनी योगदान दिले.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत चनशेट्टी, शाम जाधव, प्रणय उबाळे, गुरुदत्त जाधव, सुरज रघोजी, हिंदुराव गोरे, रोहन सावंत, अपूर्व जाधव, ऐश्वर्या जाधव, अर्चना आघाव, स्नेहल गोरे, अनिता कुंभार, बेनझीर काझी, श्रद्धा खरटमल, रोहन चव्हाण, सिद्धार्थ जगताप, संकेत कांबळे, गुरुनाथ केरूर, निखिल अंकुशे, आकाश मुस्तारे, ओमकार अतनुरे, अखिलेश चिक्कळी, राहुल यळसंगी, गोपाळ नाडीगोटू आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!