सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिकेच्या वतीनं संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिवसानिमित्त सोलापूर महानगर पालिकेच्या कौन्सिल हॉल येथे आज संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमुर मुलांणी, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, आरोग्य अधिकारी डॉ.रेखा माने, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, नागनाथ मेंडगुळे, युवराज गाडेकर, लक्ष्मण दोंतूल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठे संख्येने उपस्थित होते.
तसेच 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागात संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.