
सोलापूर : प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील मौजे भोसे गटातील व इतर मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी यांना डाळींब व इतर पिके यांना सन २०१८-१९,२०१९-२०,२०२०-२१,२०२१-२२,२०२२-२३,२०२३-२४ सालातील पिक विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून देखील न्याय न मिळाल्याने शेतकरी लोकसभा उमेदवार आणि प्रशासन यांच्यावर नाराज असून उमेदवार मंगळवेढा तालुक्याच्या शेतकऱ्याना जर न्याय नाही देत नसतील तर मंगळवेढा दक्षिण भागात प्रसाचारा साठी कोणीही येऊ नये. जर आम्हास न्याय नाही मिळाल्या आम्ही भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्यामध्ये सुध्दा न्याय नाही तर विधासभा निवडणुकीवर बहिष्कार घालू. असा इशारा मंगळवेढा येथील शेतकऱ्यानी पत्रकार परिषदेत दिला.
या पत्रकार परिषदेस श्रीशैल हत्ताळी, महादेव इंगोले, आहिलप्पा पुजारी, लक्ष्मण क्षिरसागर, निलकंठ साखरे, काशिनाथ लेंगरे, आदी उपस्थित होते.