6 ते 12 जून दरम्यान आंतरराष्ट्रीय कथाकार प्रदीप मिश्रा यांची राहणार उपस्थिती, शिव महापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन

सोलापूर : प्रतिनिधी
मरीआई चौकातील अंतरिक्ष मल्टीकॉन मैदानावर 6 ते 12 जून दरम्यान आंतरराष्ट्रीय कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथेच्या मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. या कथा स्थळाला श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर कथा नगरी हे नाव देण्यात आले आहे. त्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या मंडपाच्या भूमिपूजना प्रसंगी गंगापूजन, गणेश पूजन, नवग्रह पूजन करण्यात आले.
श्री शिव महापुराण कथा समितीचे अध्यक्ष मधुसूदन कालाणी, उपाध्यक्ष जवाहर जाजू, कार्याध्यक्ष चंद्रकांत तापडिया, सचिव चिदानंद मुस्तारे, यजमान श्रीकांत लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. पूजेचे पौरोहित्य चिदानंद स्वामी यांनी केले. याप्रसंगी सर्व समिती सदस्य अशोक बाहेती, गोकुळ झंवर, प्रवीण चंडक, शुभम तिवारी, सीए राजू मालू, राजगोपाल सोमाणी, महेश भंडारी, नाना सलगर, रोहन नागणे, शुभम दायमा, लालू खंडेलवाल, रणछोडदास लोया, गोकुळ जाजू, लक्ष्मीकांत लड्डा, गोविंद चंडक आदी उपस्थित होते.