बाबा सिद्दिकींचा मृत्यू म्हणजे गृह खात्याचा भोंगळ कारभार, मला देखील तीन वेळा जीवे ठार मारण्याची धमकी, अशा धमक्याना मी घाबरत नाही : फारूक शाब्दी
बाबा सिद्धीकींना एमआयएमकडून श्रद्धांजली अर्पण

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकिंना सोलापुरात एमआयएमच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बाबा सिद्धीकीं यांच्या हत्येला सर्वस्वी जबाबदारी म्हणजे गृहखातेच आहे. सिद्दिकीच्या हत्ये नंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
एमआयएम सोलापूर शहर आणि जिल्हा अध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या अध्यक्षतेखाली बाबा सिद्धीकीं यांना सोमवारी सायंकाळी शहरातील विजापूर वेस येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असलेल्या या एका माजी मंत्र्याला असे ठार केले जाते तर सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात आहे असे मत एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र पोलीस यांचे हात बांधलेले आहेत, अन्यथा गुंडाचा कधीच बंदोबस्त झाला असता. महाराष्ट्र पोलीसांचे हाथ कायद्याने बांधलेले आहे पोलिसांना फक्त थोडा वेळ मोकळे सोडा आणि गुंडाचा आपोआप बंदोबस्त होईल असे खुले आवाहन एमआयएम नेते व सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवार फारूक शाब्दी यांनी केले आहे.
मला देखील तीन वेळा जीवे ठार मारण्याची धमकी
एमआयएम नेते व सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक शाब्दी यांनी माध्यमांना माहिती देताना, राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील जनतेची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. मला देखील जीवे ठार मारण्याची धमकीचे पत्र मिळाले आहे. याबाबत मी पोलिसांना अजूनही तक्रार केली नाही परंतु सलमान खान, बाबा सिद्दिकी सारखे कडक बंदोबस्त असलेले निशाण्यावर आहेत त्यामुळे मला देखील भीती वाटत आहे.
मला देखील परिवार आहे. अशी प्रतिक्रिया फारूक शाब्दी यांनी दिली आहे. परंतु अशा धमक्याना मी घाबरत नाही उमेदवारी मागे घेण्यावरून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे असेही पुढे बोलताना फारूक शाब्दीनी प्रतिक्रिया दिली.