स्नेहदीप पब्लिक स्कूलचे 9 वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
स्नेहदीप पब्लिक स्कूलचे 9 वे वार्षिक स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विशाल भांगे, पत्रकार शिवानंद येरटे, गोटे सर, वलगे सर, चव्हाण सर, घाडगे सर, बुरगुटे सर आणि इलियास सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात स्नेहदीप पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप पाटील व स्नेहा पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्या प्रिया कौशिक आणि संचालक सुभाष कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी उपमहापौर दिलीपभाऊ कोल्हे म्हणाले, स्नेहदीप पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप पाटील आणि स्नेहा पाटील यांनी खूप परिश्रम घेतले आहे. चाळीतील गिरणी कामगाराचा मुलगा विद्यार्थ्यांना नवी, चांगली दिशा मिळावी यासाठी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून काम करत आहे. अनेक मुलांना ते उत्तम दर्जाचे शिक्षण देत असून त्यांच्या नवीन उपक्रमाला शुभेच्छा ही दिल्या.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मने जिंकले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, कर्मचारी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.