अनिता गवळी यांचा स्तुत्य उपक्रम, श्री संत रोहिदास महाराज जयंती निमित्त अनेक समाज उपयोगी कार्यक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
श्री सदगुरू गेणुबुवा संत सेवा भजनी मंडळ, माता नवरात्र तरुण मंडळ व राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती थोबडे वस्ती जुना देगांव नाका सोलापूर येथे रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर व भजन संध्या या कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना व पूजा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्या हस्ते झाली. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन सोनवणे यांच्या हस्ते झाले.
दुपारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिल चे माजी अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ मिलिंद थोबडे व कैकाडी समाज अध्यक्ष नागेश गवळी यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्या महिलांचा व मुलींचा सत्कार करण्यात आला.
प्रथम क्रमांक उषाताई लांबतुरे यांना पैठणी तर श्रद्धा पोतदार व मनिषा पारवे यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक साडी भेट देण्यात आली. तसेच समाजातील मृदंग भूषण पुरस्कार प्राप्त पखवाज वादक दिलीप वाघमारे, तलाठी परीक्षा उत्तीर्ण लक्ष्मण शिंदे, मुंबई कोर्ट स्टेनो परीक्षा उत्तीर्ण स्वप्निल लांबतुरे,
मुंबई पोलीस परीक्षा उत्तीर्ण ऋतुजा शिंदे, मनपा सोलापूर आरोग्य समिती वर सदस्य निवड अनिता गवळी व राज्य स्तरीय तलवारबाजी मेडल प्राप्त गणेश लांबतुरे यांचा सत्कार करण्यात आला.
सायंकाळी ८ ते १० श्रीकांत शिंदे यांचा भजन संध्या कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिता गवळी, अध्यक्ष दत्ता बनसोडे, विशाल शिंदे, उपाध्यक्ष आकाश लांबतुरे, सचिव अविनाश वंजारी, समाधान वाघमारे, अनिल गाडे, परमेश्वर वाघमारे कविता लांबतुरे, राणी कवडे, विठ्ठल मेट्रे आदी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.