श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरातर्फे भाविकांना दोन टन लाडू प्रसादाचे वाटप, दर्शनासाठी भाविकांच्या लागल्या रांगा

सोलापूर : प्रतिनिधी
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात भाविकांना २ टन लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे २० हजार लाडू प्रसादाच्या पाकिटांचे वितरण शुक्रवारी झाले.
शुक्रवारी पहाटे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला. यानंतर सामूहिक आरतीनंतर श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराजांच्या बंधूंचे पणतू रमेश टेंबे आणि भक्त मीना जोशी यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यानंतर विविध भजनी मंडळांनी सुरेल भजने सादर करीत भक्तांना ठेका धरायला लावला.
यावेळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, मंदिर समिती सदस्य सुभाष बद्दरकर, रवी गुंड, सम्राट राऊत, रमेश देशमुख, रामभाऊ कटकधोंड, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.
आज रथ आणि पालखी मिरवणूक
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शनिवारी (दि. १५) शहरातील पारंपारिक मार्गावरून रथ आणि पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात समोर होईल. भाविकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले आहे.