“अब किं बार जैनुद्दिन भाई” असे म्हणत राज ठाकरे यांनी खांद्यावर टाकला हात, लागलीच “शेख झाले शेर”

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरे हे दोन दिवस सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी प्रारंभी रूपा भवानी चौक येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
यावेळी राज ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख पुढे येताचं राज ठाकरे म्हणाले, “आपकी बार जैनुद्दीन भाई” असे म्हणत त्यांनी जैनुद्दीन शेख यांच्या खांद्यावर हात टाकत, फोटो काढण्यास सांगितला. त्यानंतर जैनुद्दीन शेख यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण माहिती दिली. हा मतदारसंघ मनसे कसा जिंकून आणेल व शेख यांचे दक्षिण मतदार संघातील कामाची माहिती देत, समाजनिहाय मतदारांची आकडेवारी ही दिली. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सर्वसामान्य, गोरगरीब, सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना जैनुद्दीन शेख तातडीने लागेल ती मदत करतात.
राज साहेबांचा आशीर्वाद मिळाला तर यंदाच्या वेळेस मनसेचा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार होईल असा विश्वास जैनुद्दीन शेख यांनी व्यक्त केला. शेख यांचा प्रामाणिकपणा, कामाची पद्धत, एकनिष्ठता, राज ठाकरे वरील प्रेम पाहून राज ठाकरे यांनी जैनुद्दीन शेख यांना मिठी मारत कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.