सोलापुरातील युवक आक्रमक, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांचा फोटो मुतारीवर लावून जोडेमार करत दिल्या घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शासन प्रतिष्ठान व राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने सोलापूर येथे सार्वजनिक मुतारी व सुलभ शौचालय मध्ये मस्साजोग येथे झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्याबाबत आरोपीचे फोटो मुतारी येथे लावून घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अन्यथा जनतेच्या हवाली करण्यात यावे. तसेच धनंजय मुंडे यांचची आमदारकी रद्द करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे अशी भावना यावेळी छत्रपती शासनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गावंडे, विश्वजीत चुंगे यांनी व्यक्त केली.
घडलेली घटना ही अतिशय निदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी असून इथे कुठल्या जातीचा प्रश्न नसून वृत्तीच्या विरोध करण्यात आला व तपासी यंत्रणा ही त्यांचे काम कोणत्याही दबावामध्ये करत नसून आरोपींना फासावर लटकवेल अशी महाराष्ट्र राज्यातील जनतेला अपेक्षा आहे.
यावेळी कुणाल गावंडे, बजरंग पाटेकर, अमोल खेडकर, अमोल माने, ओंकार समाणे, प्रसाद साळुंखे, अतुल सलगर, प्रसाद नवले, विनायक काटकर, भीमराव जाधव, रणजित माने, योगेश कोंडाबत्ती, अनंत पवार, हरीश पाटील, भाऊकांत जाधव, जहीर गोलंदाज, अजय धुळखेडकर यांची उपस्थिती होती.