किरण माशाळकर यांची तत्परता, युवतींच्या समस्यांची पाहणी करून त्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याची दिली ग्वाही

सोलापूर : प्रतिनिधी
पुणे स्वारगेट येथे घडलेल्या घटना, बसेस मध्ये महिलांवर गैर गोष्टी करण्यात आल्या तर सोलापूरच्या ठिकाणी सुद्धा असेच बसेस पडलेले आहेत. बुरला कॉलेजच्या समोर परिसर असलेल्या ठिकाणी कित्येक वर्षांपासून पडलेले बसेस आहेत आणि त्या ठिकाणी काही वेगळ्याच गोष्टी होऊ नयेत यासाठी अगोदरच ॲक्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी कॉलेज च्या मुलींच्या समस्या ऐकून घेतल्या.
त्या ठिकाणी वेगळेच काही गोष्टी होऊ नयेत यासाठी प्रशासनाला विनंती केली की लवकरात लवकर बुर्ला कॉलेजच्या समोरचे बसेसची व्यवस्था व स्वच्छता केली पाहिजे अन्यथा आम्ही कॉलेजच्या सर्व मुलींना घेऊन आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी दिला.
सोलापूर शहरातील मुलींच्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर असून येणारा काळात शासनाकडे पाठपुरावा करून योग्य त्या उपाय योजना करू अशी ग्वाही देखील किरण माशाळकर यांनी दिली.