अपोलो हॉस्पिटल्समध्ये ३४८ मूत्रपिंड प्रत्यारोपण २०४ यकृत प्रत्यारोपण १० हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, डॉ. संजीव जाधव यांची माहिती

सोलापूर : प्रतिनिधी
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदय प्रत्यारोपणानंतर हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील १० रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. या रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपणाच्या या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून हृदय प्रत्यारोपणामध्ये मोठे शिखर गाठले आहे, अशी माहिती नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सीव्हीटीएराचे वरिष्ठ सल्लागार, हृदय व फुप्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखालील हृदय प्रत्यारोपण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे रुग्ण सर्व वयोगटातील म्हणजेच २९ ते ५६ वर्षे वयोगटातील होते आणि त्यांच्यावर करण्यात आलेले प्रत्यारोपण १०० टक्के यशस्वी झाले आहे. हृदयरोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या रुग्णाना हृदय प्रत्यारोपणामुळे जगण्याची दुसरी संधी मिळते. अपोलो हॉस्पिटल्समध्ये, आम्ही एक व्यापक हृदय प्रत्यारोपण कार्यक्रम प्रदान करतो, जो शेवटच्या टप्प्यातील हृदयरोग असलेल्या व्यक्तीसाठी जीवन वा- चवणारा उपाय ठरतो.
अंतीम टप्प्यातील हृदय निकामी झाल्याची समस्या उद्भवते आणि जेव्हा इतर सर्व वैद्यकीय उपचार रुग्णाची समस्या सोडविण्यात अपयशी ठरतात तेव्हा हृदय प्रत्यारोपण ही एक महत्वांची आणि जीवन वाचवणारी प्रक्रिया पार पाडली जाते. या प्रक्रियेमध्ये मृत दात्याकडून हृदय घेतले जाते व निकामी झालेल्या हृदयाच्या जागी निरोगी हृदय बसवले जाते. भारतात हृदय प्रत्या रोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रत्यारोपणाची टीम, जलद वाहतूक प्रणाली आणि दाता, प्राप्तकर्ता यांच्यामधील अचूक समन्वयाची आवशक्यता आहे.
आत्तापर्यंत हॉस्पिटलमध्ये अपोलो ३४८ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २०४ यकृत प्रत्यारोपण आणि दहा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडल्या आहे, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. यावेळी हृदय प्रत्यारोपणाच्या रुग्णांनी ऑनलाईन ने पत्रकारांना शस्त्रक्रियेबद्दल पद्धती- यशस्वी माहिती दिली.