आजी माजी इच्छुक नगरसेवक कुठेयत, पालिका कर्मचारी “लाव लिजाव टिमकी बजाव” पद्धतीने करतात काम, स्थानिक नागरिकांचा आरोप

सोलापूर : प्रतिनिधी
22 ऑगस्ट 2024 पहाटे 5:30 AM ला मुसळधार पाऊस झाला तेव्हा पासुन कोंगड, कुंभार गल्ली उत्तर सदर बाजार भागात, ड्रेनेज चे घाण पाणी घरात शिरले. सबंध भागात ड्रेनेजचे पाणी वाहत असून घराघरात शिरल्याने रोगराई, दुर्गंध मोठ्या प्रमाणात पसरली आहे.
लहान मुले मुली, ज्येष्ठ नागरिक यांना दुर्गंधीमुळे त्रास होऊ लागला आहे. महापालिका झोन क्रमांक आठ येथे स्थानिक नागरिक जाऊन तक्रार केली, अधिकारी कर्मचारी येतो म्हणाले परंतु अद्याप 24 तास उलटून गेले तरी देखील कोणीही तिकडे फिरकले नाही.
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देखील नागरिकांनी सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी लागलीच तत्परता दाखवत संबंधित झोन विभागाला नागरिकांच्या समस्या दूर करण्याच्या सूचना दिल्या. परंतु “लाव लिजाव टिमकी बजाव” या म्हणी प्रमाणे कर्मचारी आले नुसतं बघून गेले परंतु प्रत्यक्षात काम मात्र केले नाही.
मागील दोन दिवसापासून अंगणवाडी समोर ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. लहान मुलांना अंगणवाडीला येण्यास त्रास होत आहे काल एक मुलगा ड्रेनेजच्या पाण्यामध्ये घसरून पडला. शेजारी डिलिव्हरी झालेल्या महिला आहेत त्यांना देखील त्रास होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील काम होत नाही याची दखल कोण घेणार.?
मंजुळा घोडके (अंगणवाडी सेविका)
आजी माजी इच्छुक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष देऊन समाज हितासाठी कामे करणे अपेक्षित आहे. परंतु त्यांचे ही दुर्लक्ष झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यावेळी सुरेश सदाफुले, लक्ष्मण तळे, राकेश कांबळे, बालाजी हटकर, गंगाधर शिंदे, गणेश कांबळे, दशरथ कांबळे, अभिषेक दावनकर, यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्या विषयी रोष व्यक्त केला.