अनंत जाधव यांनी मराठा वस्तीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लावला मार्गी, नेत्यांच्या प्रयत्नाला आले यश, ७२ लाख २८ हजार रुपयाच्या कामाला मंजुरी
पालकमंत्री गोरे, आमदार देशमुख मालक, नरेंद्र काळे, पालिका आयुक्त यांचे अनंत जाधव यांनी मानले आभार

सोलापूर : प्रतिनिधी
प्र.क्र.४ मराठा वस्ती परिसरात पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन व्हावी या मागणीसाठी माजी नगरसेवक तथा भाजपाचे नेते अनंत जाधव यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे वस्तूस्थिती मांडून मागणी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजने अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये अनुदान तरतूद करुन अनंत जाधव यांची मागणी मान्य केली.
पालिका आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत सन २०२५ २६ या आर्थिक वर्षाकरिता घेणेत आलेल्या रु.७२,२८,२९७ /- रक्कमेच्या विकास कामास प्रशासकीय मंजूरी मिळणेबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे, त्या कामास मान्यता मिळालेली आहे. माजी नगरसेवक तथा भाजपच्या नेते अनंत जाधव यांनी मराठा वस्तीसह प्रभाग क्रमांक चार मधील अनेक समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आणि अनेक प्रश्न मार्गी देखील लावले. पाण्याचा प्रश्न मराठा वस्ती भागात नेहमी भेडसावत होता त्या अनुषंगाने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नवीन मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आले.
मराठा वस्तीतील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे, उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ सचिन ओबासे, उपायुक्त संदीप कारंजे, पाणीपुरवठा अधिकारी डंके यांची मदत झाली असून त्यांचे आभार माजी नगरसेवक तथा भाजप नेते अनंत जाधव यांनी मानले.