गोकुळ वस्ताद तालमीच नावं पुन्हा एकदा महाराष्ट्रात चर्चेत
कुमार महाराष्ट्र केसरीची मानाची गदा गोकुळ वस्ताद तालमीच्या पैलवाणानं पटकावली

सोलापूर : प्रतिनिधी
रुस्तुम ए हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार यांना सबंध महाराष्ट्र नव्हे तर भारतात मामा म्हणून ओळखले जायचे हे कुस्ती क्षेत्रातील पैलवानांचे खऱ्या अर्थाने वस्ताद मामा होते. त्यांनी पैलवानांना कुस्तीची चांगली शिकवण मिळावी यासाठी पुण्यामध्ये गोकुळ वस्ताद तालीम सुरू केली.
खऱ्या अर्थाने आज रुस्तुम ए हिंद केसरी बिराजदार मामा यांच्या सारखं नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. मामानी आजवर, अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल अनेक महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्रातील दिग्गज मल्ल तयार केले आज याचं गोकुळ वस्ताद तालमीचे प्रमुख वस्ताद म्हणून राष्ट्रीय खेळाडू व अनेक किताबांचे मानकरी सागर हरिश्चंद्र बिराजदार हे सध्या तालिम सांभाळत आहेत. पैलवान विराज सावंत कुमार महाराष्ट्र केसरी 2025 तर पैलवान पंकज मुळजे 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकं जिंकले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मामांच्या विचारांचा वारसा सागर दादा सांभाळत आहेत.आज सागर हरिश्चंद्र बिराजदार यांच्या रूपाने तब्ब्ल 16 वर्षा नंतर गोकुळ वस्ताद तालमीला मानाची कुमार महाराष्ट्र केसरीची गदा आली ही अभिमानाची गोष्ट असल्याची भावना गोकुळ वस्तातील माजी पैलवानांनी व्यक्त केली.
2009 साली पिंपरी चिंचवड येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी चा मानाचा ‘किताब विजय उर्फ विक्की बनकर यांनी जिंकला होता त्यांना रुस्तुम ए हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचे मार्गदर्शन लाभले होते. आज 2009 नंतर तालमीला मानाची गदा मिळाली हे सागर बिराजदार यांचे भरपूर मोठे यश मानावे लागेल.
आज सागर बिराजदार खेळाडूंचा सराव स्वतः घेतं आहेत व मल्ल घडवत आहेत त्यांच्या कष्टाला फळ मिळालं. अशी भावना गोकुळ वस्ताद तालमीतील माजी पैलवान यांनी व्यक्त केली.