मनोज लोंढे यांचा स्तुत्य उपक्रम, भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त 134 किलो लाडू वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त भीमशक्ती सामाजिक संघटना सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने सोलापूर एसटी स्टँड येथे 134 किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सोलापूर एस टी महामंडळ वाहतूक नियंत्रण गोंजारी साहेब व आगार प्रमुख जोंधळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, ज्येष्ठ नेते भैरूआबा लोंढे, राजाभाऊ कदम, शहराध्यक्ष उमेश सुरते, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तूपलवडे, अँड कमरीनुसा बागवान, युवक काँग्रेसचे उत्तर विधानसभा अध्यक्ष पै महेश लोंढे, ज्योतीताई गायकवाड, पूजा चव्हाण, नसरीन शेख, प्रियंका गुंडला, छाया हिरवटे, सानिया पठाण, मुमताज तांबोळी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन, संयोजक, भीमशक्ती संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद रंधवे, अभिजीत डोलारे, अभिषेक पाटोळे विजय भोसले एस टी महामंडळ क्रॉस टाईप विभागीय अध्यक्ष उमेश बनसोडे, अभिषेक कांबळे, पृथ्वीराज लोंढे, समर्थ खरात, साहिल जाधव, बापू गायकवाड, अजय परदेशी आणि भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते, ML युवक प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.