तौफिक शेख यांचा इशारा, मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत असून दरवर्षी प्रमाणे महापालिकेने सोयी सुविधा द्याव्यात, अन्यथा..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ सचिन ओंबासे हे रुजू झाले. त्यानंतर त्यांची अनेकांनी सदिच्छा भेट घेतली आणि सोलापुरातील विकास कामांची मागणी देखील केली. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगरसेवक तोफिक शेख यांनीही डॉ ओंबासे यांना पुष्पगुच्छ देऊन सोलापुरात स्वागत केले.
यावेळी त्यांनी आगामी रमजान सण आणि हद्दवाढ भागातील कामे तात्काळ व्हावीत अशी मागणी केली. सोलापूर शहर व हद्दवाढ विभागात पाणी वेळेवर (दोन दिवस आड सोडणे) येणे गरजेचे आहे. पवित्र रमजान महिन्यात सर्व लोक हे उपवास ठेवतात त्यामुळे वेळेवर स्वच्छता व पाणी उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे.
शहरातील सर्व मस्जीद समोर फवारणी डीडीटी पावडर हद्वाद भागात, शहरात सर्व ठिकाणी महापालिकेच्या वतीने फवारणीची व्यवस्था करून नागरिकांना रमजान महिन्यात सर्व त्या सुख सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास हद्दवाढ भागातील नागरिकां समवेत तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांनी दिला.