महिला ओके सन्मान मे.. अजितदादा मैदान मे.. अशा घोषणा देत महिलांनी केक कापून साजरा केला अजित दादाचा वाढदिवस.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने लेखन स्पर्धेच्या माध्यमातून अजित पर्व चषकचे आयोजन.

सोलापूर : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जन विश्वास सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे सरचिटणीस विनायक रायकर, सहसचिव सायन्ना हनुमनला यांनी न्यू बुधवार पेठ डॉ.बाबसाहेब आंबेडकर उद्यान येथे 250 गरजू महिलांना मोफत साडी भेट देण्याचा उपक्रमाचे आयोजन केले होते.
जिल्हाध्यक्ष संतोष पवार, अमोल वामणे यांच्या शुभहस्ते व सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, समन्वयक दत्तात्रय बडगंची, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, ज्येष्ठ नेत्या शोभा सोनवणे, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती होते .
आयोजित कार्यक्रम जल्लोष पुर्ण वातावरणात महिलांनी उत्साहात आणि जल्लोषात ‘महिला ओके सन्मान मे अजित दादा मैदान मे, ‘एकच वादा अजित दादा, अशा घोषणा देत केक कापला महिलांनी एकमेकांना केक भरवत अजितदादांना खा सुनील तटकरे यांना शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित भैय्या अवघडे, विनायक रायकर,सायन्ना हनुमनला यांनी घेतलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. पार्टीचे उपाध्यक्ष सुजित अवघडे, विनायक रायकर, सायन्ना हनुमनला हे सामाजिक काम करत असून येणार्या काळात राष्ट्रवादीत काँग्रेस पार्टी कडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सुजितला ताकत दिली जाईल.
याप्रसंगी आनंद इंगळे, विजयानंद काळे, प्रकाश ननवरे, दत्ता सोनवणे, आशिष कदम, रोहित गायकवाड, सुरज कांबळे, राजन निकाळजे, ओंकार खेड, नागेश भंडारे, चेतन वाघमारे, भीम मुद्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
सोशल मीडिया विभागाच्या वतीने लेखन स्पर्धा
जन विश्वास सप्ताह निमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मान्यतेने शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यां साठी व त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व अजित पवारांचे विचार कार्य प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने अजित विकास पर्व कार्य शैलीवर आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण जिल्हाध्यक्ष संतोष पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का, समन्वयक दत्तात्रय बडगंची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित अवघडे, विनायक रायकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकास उपमुख्यमंत्री अजित पर्वा चषक देण्यात येणार आहे अशी माहिती सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी माध्यमांना दिली.