राजकीय
प्रणिती शिंदे-राम सातपुतेंसाठी काँग्रेस-भाजपचे सर्वोच्च नेते घेणार सोलापुरात सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 एप्रिल तर राहुल गांधी येत्या 24 तारखेला सभा घेणार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यामध्ये जोरदार लढाई सुरू आहे. सातपुते यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 एप्रिल रोजी सभा घेणार आहेत, तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोलापुरात येत्या 24 तारखेला सभा घेणार आहेत.