आमदार तात्यांकडे लावला शहर मध्य साठी वशिला, तसलीम शेख यांच्यासाठी मागितली उमेदवारी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात इच्छुकांची गर्दी पाहावयास मिळते. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळते.
राष्ट्रवादी अजित पवार गट सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक आमदार यशवंत माने यांची इरफान शेख आणि त्यांच्या मित्र परिवाराने भेट घेतली. भेट घेऊन महायुतीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीस सोडवून घेण्याबाबत निवेदन दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शहर मध्य मतदार संघ सोडवून घेऊ असे आश्वासन आमदार यशवंत माने यांनी दिला. सोलापूर शहरातील विविध विषयासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती इरफान शेख यांनी दिली.
या प्रसंगी इरफान शेख, बब्बू पैलवान, शाबाज किंग, अल्ताफ कुरेशी, राऊफ शेख आदी उपस्थित होते.