
सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभेच्या सर्वत्रीक निवडणुकी करता सोलापूर लोकसभे साठी ७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाने यंदा पासून जेष्ठ नागरिका करिता आणि ज्यांना मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान करणे शक्य नाही अशांनसाठी ज्या ठिकाणी मतदार आहेत त्या ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. वास्तविक हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असला तरी यामध्ये सत्ताधारी भाजप चे कार्यकर्ते व पदाधिकारी याचा गैरफायदा घेऊन निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरण भाजपाच्या हितार्थ मतदान करून घेत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत.
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता कर्णिक नगर येथे घडला आहे. कर्णिक नगर येथील घर नंबर ६८१-क या ठिकाणी दिगंबर जाधव व सरस्वती जाधव हे वयाची 90 वर्षे पार केलेले जोडपे आहे. त्यांचे मतदान भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भाजपाला मतदान घडवुन आणण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी महाविकास आघाडीचे कायदा विभागाचे ॲड सुरेश गायकवाड यांनी तात्काळ हस्तक्षेप करून तो प्रकार टाळला शिवाय याविषयी तातडीने निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता विभागाकडे तक्रार लेखी स्वरूपात केली आहे. ही बाब अत्यंत निंदनीय व लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. भाजपाचे कार्यकर्ते व नेते सत्तेचा गैरवापर करताना दिसत आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाचे कर्मचारी देखील सत्ताधारीच्या दबावाखाली येऊन काम करत असताना दिसत आहेत, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होताना दिसत आहे. या विषयी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानी तातडीने लक्ष घालून या घटनेची चौकशी करावी व संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
यावेळी ॲड.सुरेश गायकवाड, शिवसेना ऊ.बा.ठाकरे पक्ष, ॲड.केशव इंगळे, कॉग्रेस ॲड.करण भोसले, ॲड.दादा जाधव व ॲड.युवराज आवताडे रा.कॉ.शरद पवार पक्ष. हे पदाधिकारी उपस्थित होते.