सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गोरज मुहूर्तावर बांधल्या २७ जोडप्यांच्या रेशीमगाठी, विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी

सनईचे मंगल सुर, वऱ्हाडींची लगबग अन् प्रचंड उत्साहाने भारलेल्या वातावरणात शुक्रवारी गोरज मुहूर्तावर २७ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधल्या गेल्या. निमित्त होते स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आ. देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे.

स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानमार्फत स्व. खा. लिंगराज वल्याळ क्रीडांगणावर हा नयनरम्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडींना गंध लावून आपुलकीने स्वागत करण्यात येत होते. मैदानात सर्व वधू-वरांना देण्यासाठीचा रुखवत सजवून ठेवण्यात आला होता. आ. देवेंद्र कोठे यांनी धर्मपत्नी मोनिका कोठे यांच्यासह कन्यादान केले. विवाहापूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे वधू-वरांना कपाट, मणी मंगळसूत्र, संसारोपयोगी तब्बल २७ वस्तू, साडी, शालू, जोडवी, सफारी, जोधपुरी, चप्पल, बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या. तसेच वधू-वरांकडील तब्बल १० हजार जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती. वऱ्हाडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात ५ ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते.

विवाह सोहळ्यानिमित्त सजविलेल्या बग्गीतून वधू – वरांची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली. अक्षता पडताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पद्मशाली पुरोहित संघम् वेदपाठ शाळेच्या पुरोहितांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले.

या विवाह सोहळ्यातील वधू – वरांना आशिर्वाद देण्यासाठी ष. ब्र. अभिनव पट्टदेवरू (मैंदर्गी), पोलिस उपायुक्त विजय कबाडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सुविद्य पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी नगरसेवक मधुकर आठवले, जयकुमार माने, विनायक कोंड्याल, भाजपाचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, जनार्दन कारमपुरी, उद्योजक कुमार करजगी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नागेश गायकवाड, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, रामकृष्ण कोंड्याल, माजी उप महापौर दिलीप कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार, काशिनाथ गड्डम, श्रीकांत डांगे, मिलन कल्याणशेट्टी, शिवाजी वाघमोडे, प्रथमेश कोठे, मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, मोहन डांगरे, नागेश वल्याळ, राजकुमार हंचाटे, भाजपाच्या सरचिटणीस रोहिणी तडवळकर, प्रशांत बडवे, उद्योजक अंबदास मिठ्ठाकोल, प्रा. अजय दासरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा, मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती दत्तात्रय गणपा, इंदिरा कुडक्याल, कुमुद अंकारम, रामेश्वरी बिर्रू, राधिका पोसा, प्रतिभा मुदगल, नारायण माशाळकर, शशिकांत कैंची, बाबा करगुळे आदी उपस्थित होते. गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रास्ताविक तर श्वेता हुल्ले यांनी विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. उपस्थितांनी विवाह सोहळ्याच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले.

गोरगरिबांचा विवाहही व्हावा थाटात

गोरगरिबांचा विवाहही थाटात व्हावा या उद्देशाने मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आजवर चालत आलेली प्रथा कायम ठेवत दरवर्षी स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

— आमदार देवेंद्र कोठे, संस्थापक अध्यक्ष स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान

वऱ्हाडींनी घेतला सुरुची भोजनाचा आस्वाद

स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास आलेल्या वऱ्हाडींसाठी प्रतिष्ठानतर्फे मधुर मिलन बुंदी लाडू, आलू मटार भाजी, पुरी, मसाला भात, आमटी, डिस्को भजी अशा चविष्ट पदार्थांचा समावेश असलेले सुरुची भोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी वऱ्हाडींनी या भोजनाचा आस्वाद घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!