भारती विद्यापीठाच्या तनवीर मियांदे यास पावर लिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल

सोलापूर : प्रतिनिधी
गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या एशिया रॉ पावर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस, सोलापूर मधील एम. सी. ए.-2 (दूरशिक्षण विभाग) मध्ये शिकणाऱ्या तनवीर मियांदे यास गोल्ड मेडल प्राप्त झाले. या स्पर्धेचे आयोजन रॉ पावर लिफ्टिंग असोसिएशन यांच्यातर्फे करण्यात आले होते. गोव्यामध्ये पार पडलेल्या या पावर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये आशिया खंडातील विविध देशातील 78 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये तनवीर मियांदे दे यास गोल्ड मेडल मिळाले. त्याच्या या यशाबद्दल इन्स्टिट्यूट तर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी तनवीर मियांदे दे याचा सत्कार केला.
प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी आपल्या सत्कार पर भाषणांमध्ये भारती विद्यापीठांमध्ये नेहमीच शैक्षणिक उपक्रमांबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून विविध पुरस्कार ही प्राप्त केले असल्याचे सांगितले. आपल्या सत्कार ला उत्तर देताना तनवीर मियांदे यांनी नेहमीच इन्स्टिट्यूट चे सहकार्य लाभले असून या यशामध्ये इन्स्टिट्यूटचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.
तनवीर मियांदे यांनी एशियाई पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल मिळवल्याने त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पावर लिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा लवकरच दुबई येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी डी मेत्रे (क्रार्यक्रम समन्वयक-दूरशिक्षण विभाग) यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. पीपी कोठारी यांनी केले यावेळेस इन्स्टिट्यूट मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.