
सोलापूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनात काम करत असताना समाजाची दिशाभूल करणारे वक्तव्य एका स्थानिक वृत्तवाहिनीला शिवसेना शिंदे गटाचे सोलापुरातील नेते अमोल शिंदे यांनी दिले. यामुळे समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मी एका राजकीय नेत्याकडून पैसे घेतल्याचा खोटा आणि बदनाम करण्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे त्याचा निषेध करत तात्काळ समाजाची दिशाभूल करणाऱ्या या वक्तव्याबाबत माफी मागा अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे माऊली पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर मराठा आरक्षण चळवळ मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे नेतृत्व हे माऊली पवार यांच्याकडे आहे. समाजाच्या प्रत्येक आंदोलनात अग्रभागी नेतृत्व करत जरांगे पाटील यांच्या चळवळीचे सोलापूर हे प्रमुख केंद्र बनले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण न मिळाल्याची भावना मराठा समाजामध्ये जोर धरली असून समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माझा समाज सुज्ञ असून कोणाला पाडायचे त्यांना पाडा असे जाहीर वक्तव्य केलेले आहे. जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांना मिळणारा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून राजकीय नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
मराठा समाजाचा सोलापुरातील नेता मॅनेज होत नाही म्हटल्यावर त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र हे अमोल शिंदे यांच्याकडून रचले जात आहे. वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मला 20 लाख रुपये दिल्याचा खोटा आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.
यास प्रत्युत्तर म्हणून मी माऊली पवार या वक्तव्याचा निषेध करत तात्काळ समाजाची माफी मागा अन्यथा माझी आणि पर्यायाने समाजाची दिशाभूल करण्याचे वक्तव्य करून चळवळीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्यामुळे मानहानीचा दावा दाखल करणार आहे. अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देत आहे.