सोलापूरक्राईममहाराष्ट्र

पोलिस अधिकारी पाटील, निरगुडे, मोरे यांच्यात गुन्हे उघडकीस आणण्याची लागली स्पर्धा, तिन्ही आधिकाऱ्याच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी

मोटार सायकल चोरीचे ०८ गुन्हे शहर गुन्हे शाखेने उघडकीस असून त्यामध्ये एकूण २ लाख १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी

शहर गुन्हे शाखेचे स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथक हे सोलापूर शहर परिसरात, मोटार सायकल चोरीचे गुन्हेगारांचा शोध घेत असताना, बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे समर्थ मोटे, रा. हिप्परगा याचे राहते घराचे पत्रा कंपौड मध्ये, नंबर प्लेट नसलेल्या, चोरीच्या मोटार सायकली लावलेल्या असुन, सदर मोटार सायकली विक्रीसाठी तो, ग्राहक बघत आहे. स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथकाने, मिळालेल्या बातमी प्रमाणे, आरोपी नामे- समर्थ प्रकाश मोटे, वय-२३ वर्षे, व्यवसाय-खाजगी नोकरी, रा. घर नं-७८, बाकळे नगर, हिप्परगा, सोलापूर, यास ताब्यात घेवून, त्याचे कडून नंबर प्लेट नसलेल्या ०३ मोटार सायकली जप्त केल्या आहेत. सदरच्या ०३ मोटार सायकल पैकी, सोलापूर शहरातील ०२ तसेच फलटण, जि. सातारा येथून ०१ अशा ०३ मोटार सायकली चोरलेल्या आहेत. अशा प्रमाणे ०३ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

त्याच प्रमाणे, आरोपी नामे सचिन विलास गायकवाड, वय-४० वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. प्लॉट नं-८०, रामवाडी, हम्पिया मस्जिदीच्या पाठीमागे, सोलापूर हा, नंबर प्लेट नसलेली यूनिकॉर्न मोटार सायकल चालवित असताना, रामवाडी रेल्वे बोगद्याजवळ मिळुन आला. त्याचेकडे स.पो.नि. संदीप पाटील व तपास पथकाने कौशल्यपुर्वक तपास केला असता, त्याने सदरची मोटार सायकल कुमठा नाका सोलापूर येथुन चोरी केल्याचे कबुली दिली. त्याबाबत, सदर बझार पोलीस स्टेशन येथे गुरनं. ३०५/२०२४ भादंविसं कलम ३७९ प्रमाणे, मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल क्रमांक- MH-13 AE-5728 किंमत 50,000/- रुपये ही, वर नमूद आरोपीचे ताब्यात मिळुन आल्याने, सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.

दिनांक १८/०५/२०२४ रोजी, सपोनि/जीवन निरगुडे यांचे तपास पथकातील पोह/६६८वाजीद पटेल यांना, गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम चोरीच्या ०३ मोटार सायकल विक्री करण्याचे उद्देशाने, त्याचे घरासमोर मोकळ्या मैदानामध्ये उभा आहे. मिळालेल्या बातमीप्रमाणे भवानी पेठ, श्रीशैल नगर, येथील सहस्त्रार्जुन प्रशालेच्या पाठीमागील एका झोपडपट्टीतील घरासमोर, काटेरी झुडपाचे ठिकाणी सापळा रचून, तेथे आरोपी नामे उमेश कटयप्पा वरगंटी वय-२८ वर्षे, राहणार- वैदवाडी, प्रियंका चौक, भवानी पेठ सोलापूर यास ताब्यात घेतले. त्यावेळी, त्याच्या ताब्यातुन खालील नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटार सायकली जप्त करणेत आले आहेत.

तसेच, दिनांक १८/०५/२०२४ रोजी, सपोनि दादासो मोरे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार- राजकुमार पवार व विनोद रजपुत यांना मिळालेल्या बातमीवरुन, नेताजी सुभाषचंद्र बोस उदयान, न्यु पाच्छा पेठ, सोलापूर येथे सापळा लावुन, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे संजय शंकर जाधव वय-४० वर्षे रा. सेटलमेंट फ्रि कॉलनी नं. ३, विठठल मंदिर जवळ, सोलापूर यास त्याचे ताब्यातील नंबर प्लेट नसलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्याचेकडे ताब्यातील मोटार सायकल बाबत तपास केला असता, सदर मोटार सायकल वरून, विजापूर नाका पो. ठाणे येथे गुन्हा रजि नं. २६४/२०२२ भा.दं. वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल असल्याने, सदरची १०,०००/- रू किंमतीची मोटार सायकल जप्त करून, नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे.

अशा प्रकारे, शहर गुन्हे शाखेने, मोटार सायकल चोरीचे ०८ गुन्हे उघडकीस आणले असून, त्यामध्ये एकूण ०२,१५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.

सदरची कामगीरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/संदिप पाटील, सपोनि/जीवन निरगुडे, सपोनि/दादासो मोरे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!