संजय धनशेट्टी यांची पदोन्नतीने कार्यकारी अभियंता पदी नियुक्ती, कधी कोठे कशी झाली नियुक्ती.?

सोलापूर : प्रतिनिधी
संजय धनशेट्टी यांनी यापूर्वी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता म्हणून काम केले आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुहेरी पाईपलाईनचे कामकाज त्यांच्याच काळात सुरू झाले. त्याच बरोबर ग्रामीण भागातील अनेक योजना त्यांनी मार्गी लावल्या. केंद्र व राज्य शासनाच्या प्रयत्नातून साकार झालेल्या रे नगर पाणीपुरवठा योजनेचे कामकाज त्यांनी पाहिले आहे.
गोदूताई परुळेकर गृहनिर्माण मधील ७० हजार घराना जलजिवन मिशन मधून मुदतीत काम केले. केंद्रिय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांची दखल घेत कामाचे कौतुक केले होते. आता जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता मिळाल्यामुळे जलजीवनच्या कामाला आता आणखी गती येणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे यांनी एमजेपीतील अकरा उप अभियंताच्या पदोन्नतीने नियुक्ती जाहीर केल्या. त्यात पहिल्या क्रमांकावर संजय धनशेट्टी हे पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्त झाले आहेत.