सोलापूर

सोलापूर वकील संघाच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान, यंदा मतदानाचा टक्का वाढला, एकूण 87.17% मतदान.

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले असून कोणाचं पॅनल निवडून येणार आणि कोण अध्यक्ष होणार याकडे वकील बांधवांचे लक्ष लागले आहे. 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8 ते सायं 7 पर्यंत मतदान पार पडले. एकूण 1831 पैकी 1597 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 87.17%मतदान नोंदवले गेले. अमित आळंगे, राजेंद्र फताटे व एस.व्ही उजळंबे यांच्यात प्रमुख लढत होती. मतदारांची संख्या १८३१ इतकी असलेने. दोन बुथ वरून १० मतदान केंद्रावर मतदान करण्याची सोय करण्यात आली होती. सकाळी पहिल्या टप्प्यात आमदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकमार शिंदे यांच्या सह वयाची पंचाहत्तरी पार केलेले जेष्ठ विधीज्ञ ॲड.ए.डी.वसगडेकर, ॲड.धनंजय माने ॲड.मंगला जोशी, ॲड.एस.आर.पाटील ॲड.एस.बी.इनामदार यांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली.

विशेष म्हणजे ७ मे ला सोलापूर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे पुढील मतदानावर त्याचा परिणाम होऊ नये या करिता उजव्या हाताच्या करंगळीला शाई लावून मतदान नोंदवले जात होते. सर्व बाबींचा विचार यावेळी निवडणूक प्रक्रिया विभागाने केला होता. प्रत्येक टप्प्यावर मतदानाचे अपडेट दिले जात होते. मतदान अत्यंत चुरशीने घडवुन आणले गेले.

ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी ॲड सुरेश गायकवाड, ॲड.करण भोसले, ॲड .अविनाश काळे, ॲड अनिता रणशृंगारे, ॲड व्हि.सी.दरगड, ॲड ‌प्रथमेश शिंदे, ॲड.दादासाहेब जाधव, ॲड अजय रणशृंगारे, ॲड. रविराज सरवदे, ॲड शताब्दी कुमार दोड्यांनूवर, ॲड मोहन कुरापाटी, ॲड सुनील क्षीरसागर, ॲड सिद्धाराम म्हेत्रे, ॲड अविनाश बिराजदार, ॲड शिवाजी कांबळे, ॲड अमोल दरवट, ॲड योगराज कलबुर्मे, ॲड रफिक शेख, ॲड सहदेव भडकुंबे, ॲड आसिफ शेख, ॲड.युवराज अवताडे, ॲड.विकास कुलकर्णी, यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!