मराठा क्रांती मोर्चा ने पंढरपुरातील मराठा बांधवांना आणले एकत्र, पंढरपुरात दिसली मराठा बांधवांची वज्रमुठ
जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी पंढरपुरातून हजारो समाज बांधव येणार दिपक वाडदेकर

सोलापूर : प्रतिनिधी
गरजवंत मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सोलापूर दौरा सात ऑगस्ट रोजी शांतता रॅलीच्या माध्यमातून होणार आहे. या नियोजना साठी पंढरपूर येथे फुरसुंगी मठामध्ये मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा व अखंड मराठा समाज पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव या शांतता रॅलीच्या नियोजना संदर्भात आणि विचार विनिमय करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर हा मराठा आरक्षणाच्या चळवळीतील केंद्रबिंदू राहिला आहे पंढरपूर शहर तालुक्यातील मराठा समाज हा कोणाच्याही भूलथापाला बळी पडणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा आहे. पंढरपुरातून शेकडो समाजबांधव मनोज जरांगे पाटील यांच्या सोलापुरातील शांतता रॅलीसाठी येणार असून त्यांना लागणारी सर्वतोपरी मदत पंढरपूर मराठा समाजाच्या वतीने करण्यात येईल अशी ग्वाही बैठकीचे आयोजक दिपक वाडदेकर यांनी दिली.
पंढरपूर शहर आणि तालुक्यातील मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी कोणी रोख स्वरूपात पैसे मागत असतील तर त्यांची नावे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना कळवावी. रोख स्वरूपात रक्कम न देता वस्तू स्वरूपात मदत करावी. सर्वांनी एक दिलाने, एक विचाराने, आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा चे जेष्ठ समन्वयक दिलीप कोल्हे आणि दास शेळके यांनी केले.
यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक समाज बांधवांनी मराठा समाजाला सरसकट 50% मधून आरक्षण मिळाले पाहिजे यावर आपले मत व्यक्त केले, यावेळी दिलीप कोल्हे, दिपक वाडदेकर, दास शेळके, श्रीकांत घाडगे, किरण भोसले, आनंद पाटील, नागेश भोसले, भास्कर जगताप,
आनंद शिंगटे, रवी मोहिते, स्वागत कदम, किरण भोसले, अर्जुन चव्हाण, मोहन चोपडे, स्वप्निल साळुंखे, बाळासाहेब गायकवाड, शेखर फंड, निलेश शिंदे यांच्या सह शेकडो समाज बांधव या बैठकीला उपस्थित होते.