सर्वधर्मिय मोफत सामुदायिक विवाह सोहळा, केदारनाथ उंबरजे मित्र परिवाराचा उपक्रम

सोलापूर : प्रतिनिधी
केदारनाथ उंबरजे मित्र परिवार व वात्सल्य प्रतिष्ठान, शेळगी-दहिटणे, सोलापूर या हदवाढ भागात सन २००२ ते आजपर्यंत जनसेवा हिच ईश्वरसेवा या तत्वाने सत्ता असो वा नसो तरीहि जनता हेच जनार्दन समजुन या भागातील माता-भगिनी व वडीलधारी मंडळीच्या आशिर्वादाने विविध संघटनेच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नेते व मान्यवरांच्या आशिर्वादाने महानगरपालिकेच्या माध्यमातुन माजी स्थायी समितीचे अध्यक्ष व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या नात्याने नागरीकांच्या मुलभुत गरजा सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व यापुढेही ते करीत आहेत.
याचबरोबर गोर-गरीब होतकरु, गरजुवंताना, विद्यार्थ्यासाठी आर्थिक मदत, आदि विधायक कार्यक्रम राबवित आहे. व सामाजिक बांदीलकी म्हणून दरवर्षी भव्य रक्तदान शिबीराचे हि आयोजन केले जाते. सामाजिक ऋणातुन मुक्त होण्यासाठी सन २०१४ मध्ये केदारनाथ उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मिय मोफत सामुदायिक विवाह सोहळयाची सुरुवात एक गरजु जोडप्यांच्या विवाहाने करण्यात आली. सन २०१५ मध्ये एकूण २३ जोडप्यांचा व सन २०१६ मध्ये २६ जोडप्याचा, सन २०१८ मध्ये २१ जोडप्यांचा व सन २०१९ मध्ये २९ व सन २०२० मध्ये २७ जोडप्याचा व सन २०२३ मध्ये १५ जोडप्याचा व सन २०२४ मध्ये १६ असे गेल्या नऊ वर्षामध्ये आजतागयात १७० हुन अधिक जोडप्यांचे मोफत सामुदायिक विवाह सोहळा उत्कृष्ठ नियोजन बध्दरित्या यशस्वी करण्यात आला.
प्रतिवर्षा प्रमाणे या हि वर्षी वार शुक्रवार दि. ०७ मार्च २०२५ रोजी सायं. ६.२७ मि. या गोरज मुहूर्तावर शेळगी येथे हा सर्वधर्मिय मोफत सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले. नवरदेवासाठी सफारी ड्रेस, वधुसाठी शालु, मणी मंगळसुत्र, जोडवे, प्रत्येकी पाच प्रकारचे एकूण २५ भांडे, कपाट इत्यादी साहित्य मोफत दिले जाणार आहे, विवाह सोहळ्यासाठी उपस्थित संपुर्ण वन्हाड मंडळी सर्वासाठी स्वादिष्ठ भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे. वधु वराचे आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हे सर्व कार्य सवाद्य मिरवणुक असा यशस्वी करण्यासाठी केदारनाथ अप्पासाहेब उंबरजे मित्र परिवार व वात्सल्य प्रतिष्ठान कटीबध्द आहेत.
या विवाह सोहळयासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. वैशिष्टयपुर्ण वैवाहिक सोहळा पार पाडण्यासाठी सोलापूरातील विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर मंडळी, शेळगी – दहिटणे परिसरातील मान्यवर, विविध मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते मान्यवरांचे याकामी सहकार्य लाभत आहे.
तरी सदर विवाह सोहळा वार शुक्रवार दि. ०७ मार्च २०२५ रोजी सायं. ६.२७ मि. या गोरज मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
तरी सदर विवाह नोंदणीसाठी अंतिम तारीख शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ पर्यत असून नोंदणीसाठी खालील मान्यवरांची नांवे व मोबाईल नंबर देण्यात येत आहे. तरी गरजुनी अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात येत आहे. सदर प्रेस कॉन्फर्नस प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते.
नांव नोदणीसाठी संपर्क :
महालिंगप्पा परमशेटी – ९४२३५८८७०५, सिध्दाराम तंबाके – ९८२२८०१८०८, केदार बिराजदार – ९८६०५२७७८१, एस. आर. जडगे सर – ९४२२४६०४१६, मोहसिन इनामदार -९८२२३२१३५४, गजानन व्होनराव – ९८२२२५४६३२, शांतविरप्पा बणजगोळे – ९८८१२०३१७६, प्रा. स्वामीनाथ कलशेटी ९३७०४१३०५१, योगेश दुलंगे – ९५९५१६६९९९, योगीनाथ हदरे – ९८९०६२६३०५
केदारनाथ उंबरजे व मित्र परिवार, शेळगी दहिटणे सोलापूर. वात्सल्य प्रतिष्ठान, सोलापूर.