५ वर्षापासून १८ गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक
आवताडे शुगर फॅक्टरी, मंगळवेढा येथील चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे ९ लाखचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी
१३ जुलै २०२४ रोजी रात्री ००:३० वा. चे दरम्यान आवताडे शुगर फॅक्टर, बालाजी नगर, नंदूर ता. मंगळवेढा येथील साखर कारखान्याचे आवारातील डब्लु.टी.पी. प्लॅन्ट जवळील स्टोअर रूमचे कोणीतरी अज्ञात चोरटयांनी खिडकीचे लोखंडी गज तोडून तसेच शटर उचकटून आत प्रवेश करून ५,९४,७२० रु. किंमतीचे गनमेटन (ब्रास मटेरियल) अंदाजे ६०० किलो वजनाचे साहित्य यातील फिर्यादीचे समंतीशिवाय चोरून नेहले म्हणून चंद्रकांत नारायण राठोड, वय ४८ वर्षे, सुरक्षा अधिकारी यांनी फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं ५१२/२०२४ बी.एन.एस २०२३ चे कलम ३०५, ३३१ (४), ३(५) प्रमाणे १३ जुलै २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हे आढावा बैठक घेवून सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हयांची उकल करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्या खालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून त्यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी मोहोळ येथे हजर असता, सपोनि नागनाथ खुणे यांचे पथकातील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांना गोपनीय बातमी मिळाली की, आवताडे शुगर फैक्टरी बालाजी नगर, नंदूर ता. मंगळवेढा येथील चोरीचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील पाहिजे असलेला आरोपी नामे सुरज उर्फ डम्या स्वी चव्हाण याने त्याचे इतर साथिदारा सोबत केला असून तो, सध्या सीदणकट ता. मोहोळ येथे वास्तव्यास असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून त्यास सीदणकट येथून ताब्यात घेवून त्याचेकडे सदर गुन्हा बाबत विचारपूस केले असता, त्याने सांगितले की, मागील दोन महिन्यापूर्वी त्याने त्याचे इतर साथीदारांसोबत मोहोळ येथील भंगार व्यवसायिक यावे चारचाकी वाहनातून व मोटार सायकल वरून बालाजी नगर येथे जावून आवताडे शुगर फॅक्टरी साखर कारखान्यातील स्टोअर रूमचे खिडकीचे गज कट करून शटर उचकटून स्टोअर रूम मधील गनमेटल ब्रास साहित्याची चोरी केल्याबाबत कबूली दिली. त्यानंतर मोहोळ येथील भंगार व्यवसायिक जावेद शेख यास ताब्यात घेतले. त्यांचेकडून सदर गुन्हयातील चोरीस गेलेला ६०० किलो गनमेटल ब्रास ५,९४,७२० किंमतीचा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले ३,००,००० रू. किंमतीचे वाहन असा एकूण ८,९४,७२० रूत्र किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून कारवाई करण्यात आली आहे.
सदर गुन्हयातील ०२ आरोपींना मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं ५१२/२०२४ बी.एन.एस २०२३ चे कलम ३०५, ३३१(४), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्यांना ०२ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास सपोनि वाघमोडे सदर गुन्हयातील आरोपी नामे सुरज उर्फ डम्या रवी चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो सोलापूर ग्रामीण जिल्हयाच्या अभिलेखावरील टेंभूर्णी, वैराग, अकलुज, पंढरपूर तालुका, करकंब, बार्शी तालुका इत्यादी पोलीस ठाणे कडील दरोडा व घरफोडी चोरी यासारख्या विविध १८ गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफी नारायण गोलेकर, पोहेकों / ३८७ धनाजी गाडे, पोहेकों / सलीम बागवान, पोहेकों / मोहन मनसावाले, पोकों/ सागर ढोरेपाटील, पोकों / अक्षय डोंगरे, चापोना /समीर शेख, सायबर पोलीस ठाणेचे पोकों / रतन जाधव यांनी बजावली आहे.