वाहतूक शाखेच्या फौजदाराशी हुज्जत, एका विरुद्ध गुन्हा

सोलापूर : प्रतिनिधी
बुलेटला बसविलेला मॉडिफाय सायलेन्सर काढायला सांगितल्याने वाहतूक शाखेच्या फौजदाराशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वसीम अब्बाद शेख (रा. दहिटणे, सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
या प्रकरणी शहर वाहतूक शाखेच्या उत्तर सोलापूर विभागाचे फौजदार नागेश येणपे यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी ११.४० वाजता फौजदार येणपे हे जुना बोरामणी नाक्यावर कर्वव्यावर होते. तेव्हा वसीम हा बुलेटवर (क्र. एम एच १३ बी एल ९७५१) तेथे आला. त्याच्या बुलेटची सायलेन्सर मॉडिफाय केलेली असल्याने त्यांनी त्याला ते काढण्यास सांगितले. त्यावर त्याने मी राष्ट्रीय मानव अधिकार संस्थेचा शासकीय कर्मचारी असल्याची बतावणी करीत त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विष्णू गायकवाड तपास करीत आहेत.