सोलापूर जिल्ह्यांमध्ये चारा छावणी सुरु करण्याची मागणी, पाणी नसल्यामुळे शेतकरी आणि पशु पालक मोठ्या संकटात
सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राज्यपाल आणि मुख्य सचिव यांच्याकडे पत्रा द्वारे केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यांमध्ये चारा छावणी सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्य सचिव यांच्या कडे केली आहे. महाराष्ट्र राज्यांमध्ये गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे बहुतांश भागात भीषण पाणी टंचाई आणि चाऱ्याची कमतरता आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. जनावरांसाठी देखील चारा उपलब्ध होत नाही. दुष्काळी उपाय योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी केली आहे.
पै.माऊली हेगडे यांनी नमूद केले आहे की, सोलापूर जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश भाग हा शेतीच्या पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणावर अवलंबून आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्या मध्ये पाऊस कमी झाल्याने उजनी धरणामध्ये पाणीसाठा कमी झाला. त्यामुळे, दुष्काळाच्या तीव्रतेमध्ये वाढ झाली आहे. माणूस उन्हामध्ये उभारला तर वाळून जाईल. एवढे उन्ह आहे. पाणी नसल्यामुळे शेतकरी आणि पशु पालक मोठ्या संकटामध्ये आहेत.
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रक्रियेमध्ये सर्व शासकीय यंत्रणा व्यस्त आहे. त्यामुळे, उपाययोजना होत नाहीत. भीषण दुष्काळामध्ये उपाययोजना करून लोकांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने चारा छावण्या/चारा डेपो सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी राज्यपाल अणि मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.