सोलापूरराजकीय
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं प्रणिती शिंदे यांना जाहिर पाठिंबा, पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रिय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना देण्यात आले.
सफाई मजदूर यांच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना निवडून आणा : चरणसिंग टाक (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस)

सोलापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या उपस्थितीत सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. त्यांना खासदार निवडणुकीत निवडून आणण्याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देत आला.
पाठिंब्याचे पत्र माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, माजी महापौर संजय हेमगड्डी, राष्ट्रीय महामंत्री सुधाकरन दास पाणीकर, ठाणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आढागळे, सायमन गट्टू, शहर अध्यक्ष बाली मंडेपु, शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास रामगल यांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे.