ज.रा.चंडक प्रशालेत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन, सांघिक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संघभावना वाढून मैत्री वाढते : अध्यक्ष सचिन ठोकळ

सोलापूर : प्रतिनिधी
ज.रा. चंडक प्रशाला बाळे च्या प्रांगणात क्रीडा सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन ठोकळ, सचिवा शिल्पा ठोकळ, प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी गणेश पवार व डॉ. प्रथमेश जोशी उपस्थित होते.
याप्रसंगी मेजर ध्यानचंद व ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव व स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय तुळशीदास जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू कु. श्रावणी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सर्व राज्य -राष्ट्रीय खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांच्या हाती मशाल दिले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व पटवून देऊन, का खेळले पाहिजे सांघिक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संघभावना वाढते, मैत्री वाढते व वैयक्तिक खेळामुळे जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास वाढतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम केलं पाहिजे, खेळलं पाहिजे अशा प्रकारे खेळाचे महत्व पटवून सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर जोशी यांनी खेळाडूंना शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी खेळलं पाहिजे असा संदेश दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी आजपर्यंत आपल्या प्रशालेचे खेळाडू राज्य राष्ट्रीय स्तरावर कसे चमकत राहिले वेग वेगळ्या खेळांमध्ये आणि आपल्या संस्थेचे शाळेचे नाव कसे मोठे केलं,
त्याचबरोबर खेळाडूंना खेळाचे महत्व पटवून देऊन खेळामुळे नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण असतो, खेळाडूंनी खेळत राहावे व आपले ध्येय गाठावा अशा प्रकारचे संदेश दिले व शेवटी मैदानाचा पूजन करून आकाशात फुगे सोडून प्रत्यक्ष कबड्डी खेळायला सुरुवात झाले.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक मोहनराव घोडके, पर्यवेक्षक सतीश सुभेदार, क्रीडा शिक्षक दशरथ गुरव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. ज्येष्ठ क्रीडा शिक्षक मधुकर मुळे यांनी प्रस्तावना केले व सूत्रसंचालन एन डी दळवी यांनी केले आभार प्रदर्शन श्रीमती पवार यांनी केले.