अक्षय अंजिखाने यांचा पुढाकार, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा वाढदिवस कृष्ठरोग वसाहतीतील नागरिकांसमवेत साजरा

सोलापूर : प्रतिनिधी
भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने मित्र परीवाराच्या वतीने कुष्ठरोगी रुग्णांची सेवा करुण भारतीय जनता पार्टीचे यशस्वी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाढदिवासा निमित्त भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने मित्र परीवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रॉबिन हूड आर्मी सोलापूर च्या दररोज अन्नसेवा उपक्रमामध्ये योगदान देत वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिखाने यांनी “सेलिब्रेशन नको सेवा करुया” या उद्देशाने बॅनर, आदींवर खर्च न करता गरजु कुटुंबाची सेवा करत असल्याचे बोलताना सांगितले.
सदर प्राप्त अन्नपदार्थ हे सोलापुरातील कुष्ठरोगी रुग्ण, बेघर, अपंग, निराधार, रस्त्यावरचे गरजु व सिव्हिल हॉस्पिटल येथील पेशंट आणि नातेवाईक यांना एक वेळचे जेवण म्हणून वाढण्यात येत असल्याचे रॉबिन हुड आर्मीचे हिंदुराव गोरे यांनी सांगितले.
या प्रसंगी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, हेमंत पिंगळे, राजाभाऊ माने, यतिराज होनमाने, महेश देवकर, विजय कुलथे, विश्वनाथ प्याटी, बंटी क्षीरसागर, विशाल बनसोडे, ओंकार होमकर, अनिल अंजनालकर, विकास धायफुले व पदाधिकारी उपस्थित होते.