बाबा धावले नागरिकांच्या मदतीला, तात्काळ सोडवल्या समस्या, नागरिकांनी केले कौतुक

सोलापूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक संपली काँग्रेसच्या शहर मध्ये चे आमदार प्रणिती शिंदे या निवडून येत खासदार झाल्या. येणाऱ्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होईल तत्पूर्वी किंवा विधानसभा निवडणुकी नंतर महापालिकेची निवडणूक होणार आहे. याची तयारी आजी-माजी नगरसेवक, इच्छुक, नवीन युवा कार्यकर्ते नगरसेवक होण्यासाठी आपापल्या परीने तयारी करत आहेत.
प्रभाग 15 येथे महापालिका आयुक्त शितल तेली उगले याच्या निवास्थाना जवळ खुप मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाण्याची गळती होत होती. यामुळे त्या परिसरातील नागरिक, व्यापारी आणि हॉस्पिटलमध्ये येजा करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
यावेळी काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी संबंधित अधिकारी यांना याबाबत कळवले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या सूचनेने पाणी पुरवठा अधिकारी तपन डंके यांनी काम सुरू केले.
याच प्रमाणे प्रभाग 15 येथील पंखाबावडी, दर्बी कलेक्शन जवळ झाड कोसळलेले होते. शहर अभियंता सारीका अकुलवार यांना फोन वरून सर्व माहिती अंबादास करगुळे यांनी दिली.
अकुलवार यांनी नागरिकांच्या सोयीसाठी तात्काळ दखल घेत काम सुरू केले. नागरिकांच्या रहदारीस पादचाऱ्यास कोणतीही अडचण होणार नाही. अशी दखल घेत झाड काढून घेण्यात आले. बाबा करगुळे यांच्या तत्परतेने त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.