मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान

सोलापूर : प्रतिनिधी
साहित्य शिक्षण आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये असाधारण योगदान दिल्याने सोलापूरचे भूषण अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना नुकताच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांची भेट घेऊन शाल, पुष्पगुच्छ छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देऊन विशेष सन्मान करण्यात आला. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांनी मराठी भाषेला एक लाखाहून अधिक शब्द देवून मराठी भाषा संपन्न आणि समृद्ध केली त्यांच्या या योगदानाबद्दल आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा हा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जेष्ठ पत्रकार दशरथ वडतीले, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, सांस्कृतिक व चित्रपट विभाग शहराध्यक्ष आशुतोष नाटकर, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे यांची उपस्थिती होती.