आनंद जाधव की देवेंद्र कोठे, शहर मध्य ची जागा भाजपला सुटण्याची चर्चा, निष्ठावंताला न्याय मिळावा कार्यकर्त्याची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर मध्य महायुतीचा तिढा सुटल्याची चर्चा सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात रंगली असून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा भाजपला सुटल्याच बोलले जातय. सोलापूर शहर मध्य ची जागा मिळवण्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये वरचढ सुरू होती परंतु सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ही जागा भाजपला सुटली आहे. भाजपाला ही जागा सुटल्यानंतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला येथून लढण्याची संधी मिळावी असेही बोलले जाते. यासाठी प्रामुख्याने भाजपचे माजी नगरसेवक तथा निष्ठावंत कार्यकर्ते भाजप शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
तर भाजपमधील युवा नेते देवेंद्र कोठे यांच्याही नावाची चर्चा आहे परंतु देवेंद्र कोठे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख दावेदार तथा माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे असून त्यांनी काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामार्फत भाजपमध्ये प्रवेश केला. मध्य मध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले परंतु त्यांच्या नावाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, शिष्टमंडळाने विरोध करत तसे पत्र देखील प्रदेश अध्यक्ष तथा कार्यालयास पाठवून दिले आहे.
काही तासात शहर मध्य ची उमेदवारी जाहीर होणार असून नेमकी कोणाला मिळणार, कोण बाजी मारणार, हे येणारा काळच ठरवेल परंतु याविषयी शहर मध्य मध्ये चर्चेला उधाण आले आहे.