आत्मक्लेष आंदोलन.. कळ्या फिती बांधून नोंदवला निषेध, शेळके-रसाळे आक्रमक
शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी, भ्रष्टाचार करणाऱ्यांना शासन व्हावे

सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजकोट, मालवण येथे काही दिवसापूर्वी पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चबुतऱ्या वरून खाली पडून भंग झाल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची अधिक माहिती जेष्ठ समन्वयक दास शेळके यांनी दिली.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे चित्र हे मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. अद्याप पर्यंत अशी घटना राज्यात देशात कुठेही आतापर्यंत झालेली नाही. यामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याला शासन व्हावे अशी मागणी समन्वयक सुनील रसाळे यांनी केली.
यावेळी प्रा शिवाजी सावंत, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे, श्रीकांत घाडगे, आनंत जाधव, बाळासाहेब गायकवाड, शेखर फंड, सुनिल हुंबे, महेश सावंत, शिरीष जगदाळे, विजय पोखरकर, चक्रपाणी गज्जम, फारुक शेख, चेतन चौधरी, आदीसह युवक उपस्थित होते.