बुरशी युक्त उसळ विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या स्मार्ट बाजारवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : अमोल गोसावी
अन्न औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील आसरा चौक येथे स्मार्ट बाजार असून येथे अनेक गृहपयोगी वस्तू विक्री केली जाते. या स्मार्ट बाजार मधून सरदार पटेल यांच्या कुटुंबीयांनी घरगुती साहित्य आणि खाद्यपदार्थ खरेदी केले. त्यामधील उसळीचा डबा हा घरी आल्या नंतर उघडून पाहिले असता त्यामध्ये बुरशी आणि किडे आढळून आले.
यासंबंधी लागलीच सामाजिक कार्यकर्ते अमोल गोसावी आणि सरकार पटेल हे आपल्या कुटुंबासह स्मार्ट बाजार येथे गेले. स्मार्ट बाजार मधील प्रमुखांना माहिती दिली असता त्यांनी उद्धट आणि उर्मट भाषेत उत्तरे दिली.
उलट उत्तर देताना स्मार्ट बाजार मधील कर्मचारी म्हणाले, हा डबा परत करा तुम्हाला दुसरा उसळ डबा देतो हा डबा हॉटेल व्यवसाय मध्ये जातो, तुम्हाला दुसरा डबा देण्यात येईल परंतु असे कसे होणार हॉटेलच्या जेवणातून ही बुरशी, किडे नागरिकांच्या जेवनात आली तर त्यांना त्रास होईल असे बोलले झाल्याची माहिती पटेल कुटुंबीयांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते अमोल गोसावी यांनी तक्रारदार सरदार बाबर पटेल यांच्या समवेत अन्न औषध प्रशासनास भेट दिली. ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करून समक्ष अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यावेळी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल आणि स्मार्ट बाजार मधील अन्नाची तपासणी करण्यात येईल असे बोलणे झाल्याची माहिती अमोल गोसावी यांनी दिली. संबंधित बुरशीयुक्त कीटक असणारे उसळ विकणाऱ्या स्मार्ट बाजारावर आणि प्रमुखावर कारवाई झाली नाही तर अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमोल गोसावी यांनी दिला.
अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटते वेळी ज्येष्ठ नागरिक सुहास जोशी, तक्रारदार सरदार बाबर पटेल, सामाजिक कार्यकर्ते अमोल गोसावी, पत्रकार आप्पासाहेब लंगोटे आदी उपस्थित होते.