जनशक्ती शेतकरी संघटनेचे आंदोलन, दादासाहेब घोडके व नितीन सावंत या भूमी अभिलेख मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सोलापूर : प्रतिनिधी
दादासाहेब घोडके, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, सोलापूर व नितिन सावंत, उप अधिक्षक, उत्तर सोलापूर, भूमि अभिलेख, सोलापूर यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन सन २००२ च्या कलम ८५ च्या वाटपाच्या आदेशाप्रमाणे मोजणी नकाशा तयार करण्याचे आदेश पारित करावे. नितिन सावंत यांच्यावर दाखल झालेले फौजदारी गुन्ह्याची विभागी चौकशी नेमण्यात यावी या मागणीसह जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
सोलापूर उस्मानाबाद हा नव्याने रेल्वेमार्ग होत असल्याकारणाने नितिन सावंत, उप अधिक्षक, भूमि अभिलेख, सोलापूर यांच्या मार्फत बेकायदेशिररीत्या मोजणी करून त्याचे आदेश व निर्णय दिले जात आहेत. त्यामुळे त्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशा आशयाची तक्रार दादासाहेब घोडके, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, सोलापूर यांच्याकडे १८ ऑक्टोंबर २०२४ रोजी तक्रार दिली असता, सदर तक्रारीवर दादासाहेब घोडके, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख, सोलापूर यांनी स्वतः कारवाई न करता ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार दिली. त्यांनाच चौकशी करुन योग्य अहवाल सादर करावे, असे लेखी पत्राद्वारे सांगितले आहे. वास्तविक पाहता ज्याच्या विरुद्ध तक्रार दिली, त्यालाच त्याबाबत चौकशी/निवारण करणे सांगणे म्हणजेच “चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देणे” असा होतो. सदर प्रकरणी दादासाहेब घोडके, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सोलापूर हे देखील या गैर कारभारात सामील आहेत की काय याबाबत शंका उपस्थित होत असून ते नितिन सावंत, उप अधिक्षक, उत्तर सोलापूर यांची पाठ राखणं करीत आहेत, असे दिसून येत आहे.
मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील सव्र्व्हे ९५ व १२३ या गटाची मो.र.क्र. १११५ व १११४ या पोटहिश्याची मोजणी ही बेकायदेशीर झाली उपस्थित होत असून ते नितिन सावंत, उप अधिक्षक, उत्तर सोलापूर यांची पाठ राखणं करीत आहेत असे दिसून येत आहे. म्हणजेच मौजे बाळे ता. उत्तर सोलापूर येथील सव्हें ९५ व १२३ या गटाची मो.र.क्र. १११५ व १११४ या पोटहिश्याची मोजणी ही बेकायदेशीर झाली असून आपल्या अधिका-यांना वाचविण्याचे काम करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न दादासाहेब घोडके, जिल्हा अधिक्षक, भूमि अभिलेख सोलापूर हे करीत आहेत.
मोजे बाळे येथील शेतकरी दिपक मोहन काळे व संजय मोहन काळे यांनी सर्व्हे नं. ९५ व १२३ बाळे हद्दीतील शेतजमिन मो.र.क्र. १११४ व १११५ नुसार मोजणी अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने सदर मोजणी १५ डिसेंबर २०२२ रोजी पूर्ण झाली या संदर्भात मधुकर शिवप्पा काळे व इतर तीन शेतकरी यांनी २० डिसेंबर २०२२ रोजी सदर मोजणीस तात्काळ आक्षेप घेतला होता. त्यानंतर २६ डिसेंबर २०२२ रोजी अर्जदार संजय मोहन काळे यांनी सर्व्हे नं १२३ च्या पोट हिश्याची मोजणी रद्द करून विना कारवाई अर्ज निकाली काढावे, असे लेखी पत्राद्वारे उपअधिक्षक भूमि अभिलेख उत्तर सोलापूर यांना कळविले होते. त्यानुसार सदर मोजणी रद्द करणे व संबंधित हरकतदारास या पत्राची माहिती देणे अपेक्षित होते.
परंतु नितीन सावंत, उप अधिक्षक, उत्तर सोलापूर, भूमि अभिलेख यांनी मोजणी अर्जदार दिपक मोहन काळे व संजय मोहन काळे यांच्या कडून लाच घेऊन भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून म्हणजेच “दाम दो और काम करके लो” या म्हणी प्रमाणे सदर पोटहिस्सा मोजणीच्या हरकतीबाबत नियमित सुनावणी घेतली. वास्तविक पहाता यापूर्वी तहसिलदार ता. उत्तर सोलापूर यांच्याकडे सर्व्हे नं ९५ व १२३ या जमिनीचे वाटप कलम ८५ प्रमाणे होऊन त्याचे आदेश पारीत करण्यात आले होते. त्या आदेशामध्ये पोट हिश्याची दिशा देखील ठरवून देऊन त्याचे वाटप करून स्वतंत्र ७/१२ उतारे करण्यात आले होते व त्याचा फेरफार क्र. ६८०९ नुसार सदर उताऱ्यात नोंद देखील घेतली गेलेली होती. याप्रकरणी कारवाई व्हावी या मागणी साठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले हि सर्व माहिती शहराध्यक्ष निखिल नागणे यांनी दिली.