निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प, मोठ्या घोषणा पण अंमलबजावणी होणार का.?

सोलापूर : प्रतिनिधी
राज्य शासनाचा राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. परंतु सदर अर्थसंकल्प हा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करत असताना मोठ्या पोकळ घोषणाचा समावेश केला असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्या योजनेसाठी लागणारा निधीचा मोठा तुटवडा राज्य शासनाकडे आहे. असे असताना मात्र या जाहीर केलेल्या सर्व योजना ची अंमलबजावणी होणार का असा सवाल देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे.
तसेच सर्वसामान्य कुटुंबातील महिलांचे घरचं वाढलेलं बजेट यावर कोणतीही ठोस तरतूद नाही वाढती महागाई सिलेंडरची वाढते दर याच्यावर कोणतेही नियंत्रण ठेवण्यात राज्य शासन अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी लागणारे बियाणे व खते यांच्या वाढत्या किमतीवर कोणतीही नियंत्रण या राज्य शासनाचे नाही परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पात पाडण्यात आला आहे परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यासाठी ज्या निधीची गरज आहे त्या निधीचा मात्र राज्य शासनाकडे तुटवडा आहे. छोटी व्यवसायिक, लघुउद्योजक, कुटीर उद्योजक यांच्यासाठी ठोस कोणतेही योजना करण्यात आली नाही. एकंदरीत या अर्थसंकल्पाची विवेचन करताना असे दिसते की पोकळ घोषणा ह्या निवडणुकीच्या तोंडावर केलेले आहेत. अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश प्रवक्ता प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केली.