सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या २९ एप्रिल रोजी होणाऱ्या सभेची तयारी.
नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर होणाऱ्या सभेसाठी मंडप उभारणी सुरू तर शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी मैदानाची पाहणी

सोलापूर : प्रतिनिधी
सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. आज (शुक्रवारी) २६ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्या मधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असताना दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यातील प्रचारसभांकडे जनतेचे लक्ष लागलं आहे.
भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २९ एप्रिल रोजी सोलापुरात येत आहेत. होम मैदानावर सकाळी ११ वाजता त्यांची सभा होणार याची तयारी भाजपकडून जोरात सुरू आहे. याच पद्धतीने महविकास आघडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी (SP गट) सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना (UBT ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचीही सभा २९ एप्रिल रोजी सोलापुरात होत आहे. याची तयारी सुरू असून मैदानाची पाहणी शिवसेना पदाधिकारी यांनी केली.