सोलापूरमहाराष्ट्रराजकीय
लोकसभेचा निकाल घरी बसूनच पाहा, ‘या’ संकेतस्थळावर..

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील रामवाडी धान्य गोडावून येथे होणार आहे. गोडावूनच्या १०० मीटर अंतरावर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शहरातील जांबवीर चौकात स्पिकर लावण्यात येणार असून त्याठिकाणी थांबूनच लोकांना निकाल ऐकायला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकांना देशातील कोणत्याही मतदारसंघाचा निकाल घरी बसून पाहाता येणार आहे. त्यासाठी votes.eci व result.eci.gov.in ही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संकेतस्थळ उघडल्यानंतर त्याठिकाणी आपल्याला ज्या मतदारसंघाचा निकाल पाहायचा आहे, तो निवडल्यास फेरीनिहाय निकाल त्याठिकाणी दिसणार आहे.