सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर येथे बदली, कोणत्या पदावर आले, वाचा सविस्तर..

सोलापूर : प्रतिनिधी
धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर येथे बदली झाली असून सोलापूर महानगरपालिका आयुक्त पदी त्यांची वर्णी लागली आहे.
जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी धाराशिव जिल्ह्यात काही महत्वाचे निर्णय घेतले होते तसेच तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोध्दाराच्या कामासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला असून आराखडा मंजूर होण्यापूर्वीच त्यांची बदली झाली आहे. दोन वर्षापूर्वी त्यांची जिल्हाधिकारी म्हणून बोगस नॉन क्रीमीलेअर प्रकरणात डॉ. सचिन ओम्बासे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार दाखल असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.