बेकायदेशीर सर्व डान्सबार बंद करून मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करा, मातंग एकता आंदोलन उतरले रस्त्यावर

सोलापूर : प्रतिनिधी
मातंग एकता आंदोलन संघटना सोलापूर शाखेच्या वतीने २५ जून २०२४ रोजी पासून पुनम गेट जिल्हा परिषद येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा कम डान्स बार व अवैध दारु विक्री सदर डान्स बार चालक मालक कडून खुलेआम चालू असल्याचे दिसते. या सर्व डान्सबार मालकांना पोलिसांनी करमणुक कर अधिकाऱ्यांनी व संबंधित सर्व विभागाने अनेक नोटीस देवून, कारवाई करुन ही बंद होत नाही. या सर्व बार कोणाच्या मेहरबानाने चालतात.? व पोलिस संबंधित प्रशासन मुग गिळून गप्प का.? एक्ससाईज डिपार्टमेंटचे निरीक्षक या सर्व डान्सबारचे पार्टनर आहेत का.? या सर्व प्रश्न अनुउत्तरीत असल्याने मातंग एकता आंदोलन संघटना त्याचा वाच्चता करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे.
स्थानिक पोलिस प्रशासन आमरण उपोषणाला परवानगी न दिल्याने आम्ही संघटनेच्या माध्यमातुन धरणे आंदोलन करीत आहोत. त्याच बरोबर आमच्या कार्यकर्त्यांवर खुप मोठा दडपन, प्रेशर आहे. आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा शक्यता नाकारता येत नाही. पॅराडाईज ऑर्केस्ट्रा कम डान्स बार, नागेश डान्स ऑर्केस्ट्रा कम बार, गुलमोहर डान्स ऑर्केस्ट्रा कम बार, कलवरी ऑर्केस्ट्रा कम डान्स बार, चैंपियन डान्स बार, जय मल्हार डान्स बार, विनय डान्स बार, सागर डान्स बार, रसिक डान्स बार, सुयोग डान्स बार, अम्रपाली डान्स बार, महाराजा डान्स बार, बरगुंडा डान्स बार तरी या सर्व डान्सबार मालक चालक हे कोणत्याना कोणत्या बलाढ्य राजकीय पक्षाचे नेत्याचे जवळचे आहेत.
या आंदोलना दरम्यान आमची मागणी पुढील प्रमाणे, सर्वांचे राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभुमी तपासून कायदा सर्वांना समान असल्याचे भान ठेवून प्रचलित कायद्याप्रमाणे बेकायदेशीर डान्सबार मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा व गोरगरीबांचा नशेत लुटणारा पैसा वाचावा तसेच मद्यधुंद नशेमध्ये महिलांच्या तंद्रीत भरधाव वेगात गाडी चालवून दुसऱ्यांच्या अंगावर गाडी घालणे, स्वतः जावून कुठेतरी धडकणे असे वेगवेगळे अपघात होत असल्याचे महाराष्ट्र भर चर्चा आहे, ते त्वरीत थांबविण्याच्या हेतुने समाजहिताकरीता मी बेमुदत आंदोलन करीत आहोत. अशी माहिती मातंग एकता आंदोलन चे शहराध्यक्ष रोहित खिलारे यांनी दिली. या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.