
सोलापूर : प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे स्वस्तिक प्रतिष्ठान ने डॉल्बी मुक्त जयंती हा ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव मध्ये येणाया सर्व लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतूने 2501 पाणी बॉटल चे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते तसा माजी महापौर महेश कोठे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते पाणी बॉटल वाटपास सुरुवात करण्यात आली.
11 वर्ष सातत्याने समजा उपयोगी उपक्रम स्वस्तिक प्रतिष्ठान कडून राबवले जातात. गत वेळेस 3000 लोकांना पूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी ऊन भरपूर असल्याने हा उपक्रम करण्याचा मानस स्वस्तिक प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव विभुते आणि मंडळाने ठरवला.
यावेळी उत्सव अध्यक्ष सुदर्शन खैरमोडे, अभिजित विभुते, पिंटू दूधनकर, मेघराज विभुते, रेवणसिद्ध साखरे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.