सोलापूरआरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

तळीरामांसाठी गोड बातमी.. ‘थर्टी फर्स्ट’ साठी या वेळेपर्यंत मिळणार दारू..

सोलापूर : प्रतिनिधी

नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबरला थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करून रात्री बाराच्या ठोक्याला नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. पार्टीचाही बेत असतोच. लाखो लिटर दारू अन् बिअर रिचवली जाते. असाही सगळा रागरंग असतोच. या जल्लोषात आता सरकारी आदेशाची भर पडली आहे. अर्थात हा आदेश तळीरामांच्या आनंदात भर घालणाराच आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने राज्यातील दारुची दुकाने, पब, बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा विचार करून परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

2024 वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे. थर्टी फर्स्टला रात्रभर होणारा जल्लोष विचारात घेऊन सरकारी पातळीवरही नियोजन केलं जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. या काळात मद्य आणि बिअरला मागणी वाढलेली असते. हॉटेल्स, पबमधील पार्ट्याही असतात. याद्वारे मोठ्या प्रमाणात महसूलही मिळतो. या गोष्टींचा विचार करून आता सरकारनेही वेळेत बदल केला आहे. 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी पहाटेपर्यंत दारू मिळणार आहे. बिअर/वाइन विकणाऱ्या दुकानांना मध्यरात्री 1 वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे. FLBR-II परवानाधारकांसाठी याच पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने राज्यातील दारू दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागानेच याबाबत आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार 24, 25 आणि 31 डिसेंबर या दिवशी दारू दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे. दारुची दुकाने रात्री 1 वाजपेर्यंत तर पब आणि बार यांना पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. थर्टी फर्स्टला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. या काळात कायदा सुव्यवस्था राखताना पोलिसांची चांगलीच दमछाक होते. आता तर सरकारनेच पहाटेपर्यंत दारू विक्रीची परवानगी दिल्याने पोलिसांचा कामाचा ताण आणखीच वाढणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!