स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्तीची शपथ घेऊन स्वच्छता पखवाडा उपक्रमाची सुरुवात
दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन : बिपुल कुमार मुखोपाध्याय (GM(O&M)

सोलापूर : प्रतिनिधी
एनटीपीसी सोलापूर येथे 16 मे ते 31 मे 2024 या कालावधीत 15 दिवसाच्या “स्वच्छता पखवाडा” मोहीमेची सुरूवात करण्यात आली. एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर काढून टाकून स्वच्छतेला प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या उपक्रमाची सुरुवात ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ ने करण्यात आली. यावेळी बिपुल कुमार मुखोपाध्याय, GM(O&M), VSN मूर्ति, GM (प्रोजेक्ट), नवीन कुमार अरोरा, GM (Maint.) आणि परिमल कुमार मिश्रा, GM (ऑपरेशन) यांच्या मुख्य उपस्थितीत प्रशासकीय इमारतीतील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रोत्साहन देताना बिपुल कुमार मुखोपाध्याय यांनी स्वच्छता आणि स्वच्छतेच्या महत्त्वावर भर दिला आणि प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन जीवनात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. या प्रतिज्ञानंतर शाश्वत पर्यावरणाला चालना देण्यासाठी ‘ड्रेनेज टू डायमंड’ आणि ‘गार्बेज टू गोल्ड’ या विषयांवर लक्ष केंद्रित करून NTPC वरिष्ठ व्यवस्थापन, कर्मचारी आणि हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली होती.
15 दिवसांच्या कार्यक्रमा दरम्यान, महात्मा गांधींच्या स्वच्छ आणि विकसित राष्ट्राच्या संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी एनटीपीसी लगतच्या भागात विविध उपक्रम आणि स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.