दारुड्या भावाचा खून आई व बहिणीसह चौघे निर्दोष मुक्त

सोलापूर : प्रतिनिधी
अण्णासाहेब सुरेश घोडके वय 35 रा कुरुल ता मोहोळ जि सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी त्याची आई मालन सुरेश घोडके वय :-58, बहीण शोभा नागेश कानमुसे वय 36, विठ्ठल मनोहर बिराजदार वय 36, राजकुमार पुंडलिक बिराजदार वय 34, सुनील इराण्णा सुतार वय 29, श्रीकांत चंद्रकांत बंदपट्टे वय 29 सर्व रा. सोलापूर जिल्हा यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे यांचे समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी कि, यातील मयत हा दारू पिऊन त्याची आई मालन व त्याची बहीण शोभा यांना सतत त्रास देत होता, त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून आई मालन व बहिण शोभा यांनी इतर आरोपींच्या सोबत मयत अण्णासाहेब याचा खून करण्याचा कट रचला व त्याप्रमाणे इतर आरोपींना पैशाचा पुरवठा देखील केला. त्यानंतर दिनांक:-1/7/2019 रोजी इतर आरोपींनी मयताला सोलापूर मंगळवेढा हायवे वरील हॉटेल समाधान ढाबा येथे नेऊन त्यास यतेच्छ दारू पाजून तदनंतर त्याला परत गाडीत घालून त्याचा खून करून त्याचे प्रेत हायवे नजीकच्या शेतामध्ये टाकून दिले, असे सरकार पक्षाचे म्हणणे होते या घटनेची फिर्याद मयताची पत्नी अनिता अण्णासाहेब घोडके हिने दिले. त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष बडे तपास करून दोषारोप पत्रक पाठविले होते.
सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर 17 साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी आरोपीचे वकील ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात आरोपींची घेतलेली ओळख परेड ही संशयास्पद आहे, त्याप्रमाणे सरकार पक्षाने गोळा केलेला परिस्थितीजन्य पुरावा हा विश्वासार्ह नाही, असा युक्तिवाद केला तो मान्य करून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ऍड.मिलिंद थोबडे, ऍड सतीश शेटे तर सरकारतर्फे ऍड.दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.